लातूर जिल्ह्याचं ऐतिहासिक वैभव असलेल्या गंजगोलाई परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. लातूर शहर आणि शहराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याच्या सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या.
Site Admin | February 6, 2025 5:12 PM
लातूर येथे असलेल्या गंजगोलाई परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करण्याचे उपमुख्यमंत्र्यांकडून निर्देश
