केन-बेतवा नदीजोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

केन आणि बेतवा नदीजोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची कामं जलद गतीने पूर्ण करण्याचे तसंच सर्व प्रलंबित प्रकल्प अहवाल जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्र सरकारने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारांना दिले आहेत. काल नवी दिल्लीत केन-बेतवा नदीजोडप्रकल्प प्राधिकरणाच्या सुकाणू समितीची बैठक झाली. या नदीजोड प्रकल्पात मध्य प्रदेशातील केन नदीचं पाणी उत्तर प्रदेशातील बेतवा नदीपर्यंत नेण्याचं प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे बुंदेलखंड प्रदेशाला सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे.