संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्या गोव्यात वास्को इथं समुद्र प्रताप या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्याच प्रदूषण नियंत्रण जहाजाचं कार्यान्वयन होणार आहे. समुद्राच्या पाण्यात तेल गळती झाल्यास तात्काळ निदान करुनदूषित पाण्यातून तेल वेगळं करणं तसंच दूषित घटकांचं विश्लेषण करण्यात हे जहाज सक्षम आहे. या जहाजाच्या निर्मितीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशनिर्मित सामग्री वापरण्यात आली आहे. या जहाजामुळे भारतीय तटरक्षक दलाच्या प्रदूषण प्रतिसाद, अग्निशमन आणि सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.
Site Admin | January 4, 2026 2:57 PM
संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्या गोव्यात प्रताप जहाजाचं कार्यान्वयन होणार