भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई युद्धनौका कोलंबोत दाखल

भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त सैन्य अभ्यासासाठी भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई ही युद्धनौका आज कोलंबोत पोहोचली.  श्रीलंकेच्या नौदलाने या युद्धनौकेचं उत्साहात स्वागत केलं. आयएनएस मुंबई या युद्धनौकेची या वर्षातील ही पहिली श्रीलंका भेट असून भारतीय नौदलाच्या जहाजाची ही आठवी श्रीलंका यात्रा आहे. आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यात आयएनएस मुंबई भारतीय नौसेनेद्वारे संचलित करण्यात येत असलेल्या डॉनिअर जातीच्या विमानांचे सुटे भाग पुरवणार असून ते श्रीलंकेच्या नौैदल अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहेत. या निमित्ताने भारत आणि श्रीलंका नौदलाचे काही संयुक्त कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.