डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 24, 2025 9:30 AM | INS MAHE

printer

माहे युद्धनौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार

स्वदेशी बनावटीची माहे श्रेणीतील पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका भारतीय नौदलात आज दाखल होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षपदी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी असतील. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, माहे युद्धनौकेमुळे उथळ पाण्यातील स्वदेशी लढाऊ युद्धनौकेची नवी पिढी नौदलात दाखल होत आहे. माहेच्या निर्मितीत 80 टक्के स्वदेशी सामग्री आहे. भारताच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी समर्पित ही युद्धनौका पश्चिम किनाऱ्यावर तैनात असेल. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार, कलरीपयट्टू या युद्धकलेचा महत्त्वाचा भाग आहे.