April 3, 2025 3:30 PM

printer

सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती संकेतस्थळावर जाहीर होणार

न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास वाढावा तसंच त्यात पारदर्शकता यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यासाठी सहमती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची बैठक १ एप्रिल रोजी झाली, या बैठकीत सर्व न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर याची घोषणा केली जाणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी रोकड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.