माहिती आणि प्रसारणमंत्र्यांनी नवी दिल्लीत ओपन एआयच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची घेतली भेट

माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांची नवी दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुध्दीमत्तेचं लोकशाहीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देत असून अल्टमन यांनी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं आहे. असं वैष्णव यांनी सांगितलं. ओपन एआय आधारित तंत्रज्ञानावर आधारित विविध सुविधांचा विकास, एप्सची निर्मिती आणि प्रकल्प तयार करण्याबाबत अल्टमन यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं वैष्णव यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.