डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 17, 2024 4:26 PM | Inflation | wholesale

printer

 गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात १ पूर्णांक ३१ शतांश टक्के घट

 गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात एक पूर्णांक ३१ शतांश टक्के घट झाली आहे. इंधनाच्या दरात घट झाल्यामुळे तसंच अन्नपदार्थांची दरवाढ मंदावल्यामुळे ही घट झाल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. गेल्या जुलैमधे हा दर पावणेचार टक्के होता तो ऑगस्टमधे तीन पूर्णांक ११ शतांश टक्के झाला. ऑगस्ट महिन्यात किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर पाच शतांश टक्क्यांनी वाढला. जुलैमधे हा दर तीन पूर्णांक सहा दशांश टक्के होता तो ऑगस्टमधे तीन पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला. ही वाढ होऊन देखील रिझर्व बँकेनं निर्धारित केलेल्या ४ टक्के दराच्या आतच चलनफुगवट्याचा दर राहीला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.