डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 22, 2025 1:14 PM | Cricket | INDvSA

printer

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना सुरु

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहटी इथं सुरु झाला. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे.

 

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ८२ धावांची दमदार सलामी दिल्यानंतर मार्करम आणि रिकल्टन, एकामागोमाग एक बाद झाले. त्यानंतर स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बवुमा यांनी अर्धशतकी भागिदारी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला.

 

भारताच्या वतीनं बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात २ बाद १४७ धावा केल्या होत्या.