हिरे आयातविषयक परवान्याची उद्योगमंत्री पियूष गोयल यांची घोषणा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी काल डायमंड इंपरेस्ट लायसन्स म्हणजे हिरे आयातविषयक परवान्याची घोषणा केली. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेनं आयोजित केलेल्या भारत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनात एका मुलाखतीत ते बोलत होते. या परवान्यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योजकांना लाभ होईल असं गोयल म्हणाले. या परवान्यामुळे विशिष्ट उलाढालीचे निकष पूर्ण करणाऱ्या हिरे निर्यातदारांना आधीच्या तीन वर्षांच्या निर्यातीच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपर्यंत आयात करता येणार आहे. त्यामुळे छोट्या आणि मध्यम हिरे निर्यातदारांना मोठ्या निर्यातदारांच्या तुलनेत समान संधी मिळणार आहेत.