डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्य फेरीत पी.व्ही.सिंधूचा पराभव

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पी.व्ही.सिंधूचा थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगकडून पराभव झाला. पहिल्या फेरीत २२-२० गुणांनी सिंधू आघाडीवर होती, त्यानंतर दुसऱ्या फेरीत २१-१० आणि तिसऱ्या फेरीत २१-१८ अशी आघाडी घेत चोचुवोंगने या फेरीत विजय मिळवला. तसंच आज महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा मयू मात्सुमोतो आणि युकी फुकुशिया या जापानी जोडीशी सामना होईल. तर पुरूष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी या जोडीचा सामना रासमुस केजर आणि फ्रेडरिक सोगार्ड या डॅनिश जोडीशी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा