December 9, 2025 8:30 PM | Indonesia

printer

इंडोनेशियात कार्यालयाला लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू

इंडोनेशियात राजधानी जकार्तामधे आज एका ड्रोन कंपनीच्या कार्यालयीन इमारतीला लागलेल्या आगीत किमान २२ जणांचा मृत्यू झाला. आज दुपारी ही आग लागली. अग्नीशामक दलाच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी २९ बंबांच्या सहाय्यानं अथक प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. आतापर्यंत २२ जणांचे मृतदेह हाती लागले असल्याचं पोलिसांनी सांगितलं. १९ जणांना वाचवण्यात यश आलं, मात्र त्यांना, तसंच काही पोलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनाही श्वास घ्यायला त्रास होत आहे. आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही.