September 11, 2025 8:15 PM | Indonesia

printer

इंडोनेशियामधल्या आलेल्या पुरात चौदा जणांचा मृत्यू

इंडोनेशियामधल्या बाली इथं अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात चौदा जणांचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत. शेकडो घरं पाण्याखाली गेली असून सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे बचावपथकांना बाधित ठिकाणी पोहोचायला अडचण येत आहे. तुंबलेल्या गटारांमुळे यात आणखी भर पडत आहे. तसंच पूरस्थितीचा पर्यटनावरही परिणाम झाला आहे.