भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज इंदिरा गांधींच्या ‘शक्तिस्थळ’ या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
इंदिरा गांधींचं साहस, संवेदनशीलता आणि देशभक्ती आपल्यासाठी प्रेरणादायक असल्याचं राहुल गांधींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींच्या जीवनातून कोट्यवधी भारतीयांना सतत प्रेरणा मिळेल, असे गौरवोद्गार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काढले.
 
									 
		 
									 
									 
									 
									