विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे केंद्र सरकारचे इंडिगोला आदेश

इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याची प्रलंबित प्रक्रिया उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं इंडिगोला दिले आहेत.

 

(विमानाची वेळ बदलण्यासाठी प्रवाशांकडून कुठलेही शुल्क आकारु नका. त्याचप्रमाणे प्रवाशांचं साहित्य नियोजित पत्त्यावर पुढल्या ४८ तासांत पोहोचवा असे निर्देशही सरकारनं इंडिगोला दिले आहेत. त्यावर ग्राहकांच्या तिकीटाचे पैसे परत करण्याचं काम प्राधान्याने केलं जात असल्याचं इंडिगोने म्हटलं आहे. आज रद्द होणाऱ्या उड्डाणांची संख्या कालपेक्षा खूप कमी झाली आहे, येणाऱ्या काही दिवसांत यात आणखी सुधारणा होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. 

दरम्यान विमानभाडी नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं आज त्यावर कमाल मर्यादा लादली. त्यानुसार ५०० किलोमीटर साठी साडे ७ हजार, १ हजार किलोमीटरपर्यंत १२ हजार, १५०० किलोमीटरपर्यंत १५ हजार आणि त्यापुढे १८ हजार रुपयांपेक्षा जास्त विमान भाडं कुठल्याही विमान कंपनीला आकारता येणार नाही. प्रवाशांच्या मदतीसाठी एअर इंडिया फेऱ्या वाढवण्याचा विचारात आहे. एअर इंडियाने इकॉनॉमी क्लासचे तिकीट दरही कमी केले आहेत.

दरम्यान, खोळंबलेल्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून रेल्वेने अतिरीक्त डबे जोडून अधिक संख्येनं प्रवासी वाहतूक केली आहे.)

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.