December 10, 2025 9:25 AM | IndiGo flights

printer

इंडिगोच्या कंपनीच्या विमान उड्डाणातील संख्येत 10% कपात

इंडिगोच्या विमानसेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत 10 टक्के कपात करायचे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिले आहेत.

 

ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना काल पुन्हा एकदा मंत्रालयानं बोलावलं होतं. 6 डिसेंबरपर्यंत रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटाची पूर्ण रक्कम प्रवाशांना परत दिल्याची, तसंच उर्वरित रक्कम आणि सामान परत करायची प्रक्रिया वेगानं पूर्ण करायच्या सक्त सूचना दिल्याची माहिती एल्बर्स यांनी यावेळी दिली.

 

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात इंडिगो ने 64 हजार 346 विमान उड्डाणे निश्चित केली होती पण प्रत्यक्षात त्यातील 951 उड्डाणे रद्द झाली आणि 59 हजार 438 विमान  उड्डाणे झाली. इंडिगो कंपनीला या संदर्भातील सविस्तर अहवाल नागरी विमान वाहतूक संचालनालयाने आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश.