December 8, 2025 3:39 PM

printer

इंडिगो विमानांच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी

इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर  विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू आणि डीजीसीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते मुंबईत आज वार्ताहर परिषदेत बोलत होते.

 

इंडिगो कंपनीला नफा कमावून देण्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाने त्यांना नियमात सूट दिली असा आरोप चव्हाण यांनी केला. इंडिगोच्या मालकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ५६ कोटी रुपयांची देणगी दिली होती, त्यामुळेच त्यांना नियमांना बगल देण्याची मुभा दिली गेल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.