इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय दृष्टिपथात

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यावर भारताची मजबूत पकड कायम. आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी, पावसामुळे खेळ उशीरा सुरू झाला. मात्र भारताच्या आकाशदीप यानं ओली पोप आणि हॅरी ब्रुक यांना झटपट माघारी धाडलं. त्यानंतर वॉशिंगटन सुंदर यानं उपहाराआधी बेन स्टोक याला बाद केलं. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीला लगाम बसला असून भारताला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. इंग्लंडतर्फे जॅमी स्मिथनं सर्वाधिक धावा केल्या असून त्यानं अर्धशतक पूर्ण केलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ६ बाद १८४ धावा झाल्या होत्या.