जर्मनीमध्ये सुरू असलेल्या हायलो ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुड्डा ने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उन्नतीने उप-उपांत्य फेरीत चौथ्यामानांकित चायनीज तैपेईच्या लिन हसियांग-ती हिचा 22-20, 21-13 असापराभव केला.
आता अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी तिचा सामना अव्वल मानांकित असलेल्या इंडोनेशियच्या कुसुमा वर्दानीशी होईल. उन्नती ही अंतिम चारमध्ये पोहोचणारी एकमेवभारतीय बॅडमिंटनपटू आहे.