डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 15, 2025 8:09 PM | India’s Trade

printer

देशाची व्यापारी तूट गेल्या डिसेंबरमधे २१ अब्ज ९४ कोटी डॉलर्सपर्यंत

देशाची व्यापारी तूट गेल्या डिसेंबरमधे २१ अब्ज ९४ कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचली. गेल्या नोव्हेंबरच्या तुलनेत ती सुमारे १० अब्ज ९०कोटी डॉलर्सने कमी झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की, नोव्हेंबरमधे ३२ अब्ज ११ कोटी डॉलर मूल्याची निर्यात झाली. तर डिसेंबरमधे निर्यातीत मालाचं मूल्य ३८ अब्ज १ कोटी डॉलर्सवर पोहोचलं. नोव्हेंबरमधे आयात मालाचं मूल्य ६४ अब्ज ९५ कोटी डॉलर्स होतं, ते डिसेंबरमधे ५९ अब्ज ९५ कोटी डॉलर्स इतकं झालं.  मात्र २०२३ मधल्या डिसेंबरच्या तुलनेत व्यापारी तूट १८ अब्ज ७६ कोटी डॉलर्सनी वाढली आहे.