डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 10, 2024 8:09 PM

printer

भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्र 2030 पर्यंत अंदाजे $350 अब्ज पर्यंत वाढू शकते – केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचा अंदाज

देशाच्या व्यापार आकडेवारीनुसार तयार कपड्यांच्या उत्पादनात वार्षिक ११ टक्के वाढ होत असून भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रात २०३० साला पर्यंत साडेतीनशे बिलियन डॉलर्स पर्यंत वाढ होईल असा अंदाज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने व्यक्त केला आहे. पी एम मित्र आणि उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमार्फत या क्षेत्रात येत्या ३ वर्षांत ९० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मोहिमेसारख्या अनेक योजनांमुळे भारताला वस्त्रोद्योग क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोचण्यात मदत मिळेल असं मंत्रालयाने म्हटलं आहे.