June 27, 2025 3:45 PM | suger

printer

२०२६ च्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा, राज्यात ऊसाचं क्षेत्र आणि उत्पादन वाढणार

सन २०२६च्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन १५ टक्क्यानं वाढून साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे. जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस उत्पादक राज्यांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात, उसाचं उत्पादन आणि लागवडीखालचं क्षेत्र वाढणार आहे. पुरवठा वाढल्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची चिंता कमी होईल. धोरणात्मक परिस्थिती अनुकूल राहिली तर इथेनॉल उत्पादनही मोठ्या प्रमाणात होईल, असं या अहवालात म्हटलं आहे.