आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या (ILO) माहितीनुसार, भारतातील सामाजिक सुरक्षा कवचात मागील दहा वर्षात ४५ टक्के वाढ झाली आहे. २०१५ मध्ये 19 टक्के लोक या कवचाचे लाभार्थी होते. २०२५ मध्ये हा टक्का 64 वर गेला आहे.
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने भारताच्या या यशाची दखल घेतली असून भारतातील 94 कोटींहून अधिक लोक आता किमान एका सामाजिक संरक्षण कवचाचा भाग असल्याचं नमूद केलं आहे. लाभार्थ्यांच्या संख्येनुसार भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.