डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 26, 2024 1:25 PM | RBI

printer

डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचं क्रांतिकारी पाऊल – आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

आर्थिक व्यवहारांसाठी उपयोगी असणाऱ्या GEM, UPI आणि ULI या तीन पद्धतींमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये भारतानं क्रांतिकारी पाऊल टाकल्याचं प्रतिपादन रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं. रिझर्व बँकेच्या नव्वदाव्या वर्षानिमित्त सुरू असलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून बेंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीची जागतिक परिषद आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणणाऱ्या यूपीआय पद्धतीचं कौतुक केलं. तसंच, आता रिझर्व बँक त्याच्या पुढे एक पाऊल जात असून लवकरच कर्ज व्यवहारांसाठी यूएलआय नावाची नवीन पद्धत सुरू करण्यात येईल. त्यामुळे कर्जसंबंधित व्यवहारही सुलभ होतील, असंही दास यावेळी म्हणाले.