डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

एप्रिलमधे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ३.१६%

एप्रिल २०२५ मधे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ३ पूर्णांक १६ शतांश टक्क्यांवर उतरला. मार्च २०२५मधे तो ३ पूर्णांक ३४ शतांश टक्के होता. भाज्या, कडधान्य, फळं, मांस, मासे , तसंच वैयक्तिक वापराच्या वस्तूंचे दर कमी झाल्यानं भाववाढीला आळा बसला.  अन्नधान्य किंमत  निर्देशांकात घट होऊन तो २ पूर्णांक ६२ टक्क्यांवरुन १ पूर्णांक ७८ शतांश टक्क्यांवर आला. शहरी भागात ही घट २ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवरुन १ पूर्णाक ६४ शतांश टक्के अशी झाली. ग्रामीण भागात २ पूर्णांक ८२ शतांश टक्क्यांवरुन १ पूर्णांक ८५ शतांश टक्क्यांपर्यंत दर घसरले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.