डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचं शिक्कामोर्तब

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. संघात ११७ खेळाडूंचा समावेश असून सोबत १४० तज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी असतील.

 

एथलेटिक्स प्रकारात सर्वाधिक २९ खेळाडूंची निवड झाली असून नेमबाजीसाठी २१ जण भाग घेणार आहेत. हॉकीसाठी १९, टेबल टेनिसकरता आठ आणि बॅडमिंटनसाठी सात खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील. मुष्टियुद्ध आणि तिरंदाजीसाठी प्रत्येकी ६, गोल्फ साठी ४ तर टेनिसकरता ३ खेळाडूंचा समावेश संघात केला आहे. याखेरीज जलतरण, नौकानयन, भारोत्तोलन, ज्युदो इत्यादी क्रीडाप्रकारांमधे भारतीय खेळाडू भाग घेणार आहेत.

 

पॅरिस ऑलिंपिक क्रीडास्पर्धा येत्या २६ जुलैपासून सुरु होणार असून त्या ११ ऑगस्टपर्यंत चालतील.