भारताच्या पंकज अडवाणीने केला जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

भारताच्या पंकज अडवाणीनं कतारमधे दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत काल त्यानं सौरव कोठारीचा ४-२ असा पराभव केला. सौरवला कांस्यपदक मिळालं. अंतिम फेरीत पंकज अडवाणीचा सामना इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलशी होणार आहे. हॉलनं सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचा ४-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.