लंडनमध्ये सुरु असलेल्या विम्बल्डन टेनीस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी यानं पुरुष दुहेरी स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आपला मेक्सिकन जोडीदार मिगएल रायेस-वरेला याच्याबरोबर अमेरिकन जोडीला 6-4, 6-4 असा पराभव केला. पुढच्या फेरीत बालाजी आणि रेयेस-वरेला यांची गाठ चौथ्या मानांकित स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबालोस यांच्याशी पडेल. बुधवारी युकी भांब्री आणि रित्विक बोलिपाल यांनी आपापल्या पहिल्या फेरीतील सामन्यांमध्ये विजय मिळवत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
Site Admin | July 4, 2025 12:06 PM | London
लंडनमध्ये सुरु असलेल्या विम्बल्डन टेनीस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी यानं पुरुष दुहेरी स्पर्धेतल्या दुसऱ्या फेरीत केला प्रवेश
