पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात मनू भाकरची आज लढत

पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत गाजवला. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत मनू भाकर हिनं तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. ही फेरी आज रंगणार आहे.

 

पुरुष हॉकी संघानं ब गटाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशी मात करून विजयी सलामी दिली. भारताच्या बॅडमिंटनपटूंनीही उत्तम सुरुवात केली. दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांनी, तर एकेरीत लक्ष्य सेन यानं पुढची फेरी गाठली.

 

टेबल टेसिनच्या पुरुष एकेरीच्या प्राथमिक फेरीत हरमीत देसाई यानं जॉर्डनच्या प्रतिस्पर्ध्यावर ४-० असा विजय मिळवला. रोविंगच्या स्कल्स प्रकारात पुरुष एकेरीत बलराज पन्वर यानं चौथं स्थान मिळवून पुढच्या फेरीतलं स्थान नक्की केलं.

 

महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत ५४ किलो वजनी गटात प्रीती पवार हिनं पुढच्या फेरीत प्रवेश केला. आज, तिरंदाजी, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, टेनिस, मुष्टियुद्ध, बॅडमिंटन, रोविंग इत्यादी प्रकारांमध्ये भारताचे क्रीडापटू मैदानात उतरणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.