November 1, 2024 10:00 AM

printer

वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मानसी अहलावतने पटकावलं कास्य पदक

 

अल्बानीयातील तिराना इथे झालेल्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत, महिला गटात, भारताच्या मानसी अहलावत हिने 59 किलो वजनी गटात कास्य पदक पटकावलं. काल रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात मानसीने कॅनडाच्या लॉरेन्स ब्यूरेगार्ड हिच्यावर 5-0 अशी मात केली.