डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनात गेल्या 10 वर्षात भारताची मोठी प्रगती

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनात गेल्या 10 वर्षात भारतानं मोठी प्रगती केली असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली. देशात 2014 मध्ये केवळ दोन मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्या होत्या सध्या 300 हून अधिक कंपन्या मोबाइल उत्पादन करत आहेत. 2014 मध्ये मोबाईल उत्पादनाचं मूल्य 18 हजार 900 कोटी रुपये होते तर 2024 मध्ये हे मूल्य 4 लाख 22 हजार कोटी रुपये इतके झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाढ झाल्यामुळे या क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे 12 लाख रोजगार निर्मिती झाली आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या मोहिमेअंतर्गंत आत्मनिर्भर आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन दिलं जात असल्यानं रोजगार निर्मिती होत असल्याचंही वैष्णव यांनी म्हटलं आहे.