डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन

अंशुमन गायकवाड यांचं काल बंगळुरू इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७१ वर्षाचे होते. गायकवाड १९७५ ते १९८७ या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी ४० कसोटी, १५ एकदिवसीय सामने खेळले.. २०१७-१८ यावर्षीच्या सी के नायडू जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ते निवड समितीचे सदस्य होते त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचे ते प्रमुख प्रशिक्षकही होते. त्याचबरोबर क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पहिलं होतं.

 

प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल क्रिकेट जगतात आणि क्रिकेट रसिकांमधे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून आदरांजली वाहिली आहे. क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल गायकवाड दीर्घकाळ स्मरणात राहतील, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमवरच्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या खेळानं आणि कौशल्यानं भारतीय क्रिकेटचा गौरव वाढवणारा क्रिकेटपटू, अशा शब्दात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गायकवाड यांना आदरांजली वाहिली आहे. गायकवाड यांचं क्रिकेटप्रति समर्पण अद्वितीय असल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष आणि १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातले त्यांचे साथीदार रॉजर बिन्नी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गायकवाड यांच्या निधनानं भारतीय क्रिकेट विश्वाची अपरिमित हानी झाल्याचं बीसीसीआय चे सचिव जय शहा यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.