भारताच्या परकीय चलनसाठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे. २९ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यातली ही वाढ असून, हा साठा एकंदर ६९४ अब्ज डॉलर्सपेक्षा थोडा अधिक आहे. रिझर्व बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार या साठ्याचा प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता देखील जवळपास ५८४ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असून त्यात साधारण दीड अब्ज डॉलर्सपेक्षा थोडी जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या साठ्यातही वाढ नोंदवण्यात आली असून ती साडे शह्याऐंशी अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
Site Admin | September 6, 2025 2:52 PM | dollers
भारताच्या परकीय चलनसाठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ
