May 30, 2025 7:29 PM

printer

भारताच्या परकीय चलन साठ्यात ६.९ अब्ज डॉलर्सची वाढ

गेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात ६ पूर्णांक ९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून तो ६९२ अब्ज ७० कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या साप्ताहिक सांख्यिकी पुरवणीत ही माहिती दिली आहे.  गेल्या आठवड्यात, परकीय चलन मालमत्ता ४५० कोटी डॉलर्सनं वाढून ५८६ अब्ज १० कोटी डॉलर्सवर पोचली. 

सोन्याच्या साठ्यात २३० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त वाढ होऊन तो ८३ अब्ज ५८ कोटी डॉलर्सवर पोचला आहे..