भारताच्या परदेशी चलन साठ्यात १४ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त वाढ

१६ जानेवारीला रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परदेशी चलन साठ्यात १४ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त वाढ होऊन एकूण चलन साठा ७०१ अब्ज डॉलर्स झाला. परदेशी चलन साठ्याचा मुख घटक असलेली परदेशी चलन मालमत्ता जवळपास १० अब्ज डॉलर्सनी वधारून ५६० अब्ज डॉलर्सच्या वर गेली. युरो, पाऊंड आणि येन या चलनांच्या मूल्यातल्या चढउतारांचा चलन मालमत्तेवर प्रभाव पडल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. सोन्याच्या साठ्यातही साडेचार अब्ज डॉलर्सहून अधिक भर पडली.