पुरवठा साखळीतली लवचिकता अधिक बळकट करण्यासाठी भारतानं अत्यावश्यक खनिजांच्या देशांतर्गत क्षमता निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं आहे. देशात अत्यावश्यक खनिज पुनर्वापराला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच पंधराशे कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे किमान २७० किलो टन वार्षिक पुनर्वापर क्षमता विकसित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सुमारे ४० किलो टन वार्षिक महत्त्वपूर्ण खनिज उत्पादन होईल, त्याचबरोबर सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणूक तसंच जवळपास ७० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे.
Site Admin | September 6, 2025 3:09 PM | खनिज | भारत
अत्यावश्यक खनिजांच्या देशांतर्गत क्षमता निर्मितीवर भारताचं लक्ष केंद्रित
