मेलबर्न कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आपल्या दुसऱ्या डावात, ९ बाद २२८ धावा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात, ९ बाद २२८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर १०५ धावांची आघाडी मिळवली होती, त्यामुळे त्यांची एकूण आघाडी ३३३ धावांची झाली आहे.
शतकवीर नितेश रेड्डी ११४ धावांवर नॅथन लायनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानं भारताचा पहिला डाव ३६९ धावांत आटोपला.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. मात्र आधी सातव्या गड्यासाठी अर्धशतकवीर लबूशेन आणि कमीन्स यांनी ५७ धावांची, तर दहाव्या गड्यासाठी नॅथन लायन आणि बोलँड यांनी नाबाद ५५ धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा चांगल्या स्थितीत आणलं.
दुसऱ्या डावात बुमराहने ४ तर सिराज यानं ३ गडी बाद केले.