डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वस्तू आणि सेवा निर्यातीत ५ पूर्णांक ४ दशांश टक्के वाढ

 देशाची वस्तू आणि सेवा निर्यात जून महिन्यात ५ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांनी वाढून ६५ अब्ज ४७ कोटी डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत निर्यात ८ पूर्णांक ६ दशांश टक्क्यांनी वाढून २०० अब्ज ३३ कोटी डॉलरवर पोहोचली आहे.

 

गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात व्यापारी निर्यातीत वाढ झाली. २०२४ च्या एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत व्यापारी निर्यात १०९ अब्ज ९६ कोटी डॉलरवर पोहोचली. २०२३ च्या एप्रिल ते जून महिन्यात ती १०३ अब्ज ८९ कोटी डॉलर इतकी होती. अभियांत्रिकी सामग्री, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधं, कॉफी या वस्तूंची निर्यात वाढल्यामुळे देशाच्या निर्यातीत वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटलं आहे. .