डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 18, 2025 1:20 PM | India's exports

printer

भारताच्या निर्यातीत ७.२१ टक्के वाढ

२०२४-२५ या आर्थिक वर्षात त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या निर्यातीत ७ पूर्णांक २१ शतांश टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे, तर आयातीत एप्रिल ते जानेवारी या कालावधीत ८ पूर्णांक ९६शतांश  टक्के वाढ नोंदवली गेली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काल जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली.  या कालावधीत एकंदर निर्यात सुमारे ६८३ अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे तर आयात एकंदर ७७० अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी दरम्यान व्यापारी मालाची निर्यात ३५९ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती तर याच कालावधीत आयात एकंदर ६०२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. या कालावधीत व्यापारी मालाची तूट सुमारे २४३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती, मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.