एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या सहामाहित भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या सहामाहित भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली. गेल्यावर्षी याच काळात ४३६ अब्ज ४८ कोटी डॉलर्सची निर्यात झाली होती, ती यावेळी ४६८ अब्ज २७ कोटी डॉलर्सवर पोचली. ही वाढ ७ पूर्णांक २८ शतांश टक्के आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.