सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६ पूर्णांक ६ दशांश टक्क्यानी वाढण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. जीएसटी सुधारणांमुळे अमेरिकेने लादलेल्या आयात कराच्या प्रतिकूल परिणामापासून देशाची अर्थव्यवस्था वाचण्याची शक्यता आहे, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन ७ पूर्णांक ८ दशांश टक्के इतकं होतं. तसंच मागील आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ ६ पूर्णांक ५ दशांश टक्के नोंदवण्यात आली होती. या वर्षात त्यात वाढ होण्याचा अंदाज असल्याने भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने वाढ करत असल्याचं नाणेनिधीने म्हटलं आहे. व्यापक संरचनात्मक सुधारणा करून भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रगती साधली जाऊ शकते असंही या अवहालात म्हटलं आहे.
Site Admin | November 27, 2025 1:15 PM | India's economy
भारताची अर्थव्यवस्था ६.६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज