अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरानं पटकावलं कांस्य पदक

अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरानं कांस्य पदक पटकावलं आहे. पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात धीरजने आंद्रेस टेमिनो मेडिएलचा ६-४ असा पराभव केला. या स्पर्धेतलं धीरजचं हे दुसरे पदक आहे.
या विजयासह धनुर्विद्या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशा एकंदर चार पदकांसह भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.