November 8, 2024 9:58 AM | arjun erigaisi

printer

जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत भारताचा बुद्धिबळपटू अर्जून इरिगाईसी दुसऱ्या स्थानावर

भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जून इरिगाईसीनं फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरे स्थान पटकावलं आहे. काल चेन्नई ग्रांड मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीअखेर त्यानंतर अॅलेक्सी सरानावर विजय मिळवला. 21 वर्षीय अर्जुननं ही उल्लेखमीय कामगिरी केली आहे.

 

सरानाविरूद्धच्या विजयानं अर्जुन क्रमवारीत वरची पायरी चढला आहेच शिवाय त्याला मास्टर्स श्रेणीतही आघाडी मिळाली आहे. स्पर्धेच्या तीन फेऱ्यांअखेर, अर्जुन, इराणचा ग्रॅण्डमास्टर अमीन तबाटाबैई यांच्याबरोबर गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. काळ्या सोंगट्यांसह खेळताना अर्जुनने त्याच्या रणनीती कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यालाही चकित केलं.