भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर आणि याविरोधात केलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरली. तिच्या चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं. विनेशचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्याआधी विनेशचं वजन १०० ग्रॅम जास्त भरल्यानं तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं होतं. याविरोधात तिनं क्रीडा न्यायालयात दाद मागितली होती आणि संयुक्तरीत्या रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. तिची, ही याचिका फेटाळून लावण्यात आली.