कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत, महिलांमधे ५० मीटर थ्री पोझिशन सांघिक प्रकारात सिफ्त कौर सर्मा, आशी चौक्सी, आणि अंजुम मौदगिल यांनी सुवर्णपदक पटकावलं.
पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टलमधे भारतीय नेमबाज अनीश भनवाला याचं सुवर्णपदक अवघ्या एका गुणानं हुकलं, आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या सू लियाबोफान यानं ३६ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर दक्षिण कोरियाच्या स्पर्धकानं कांस्यपदक मिळवलं.
याच प्रकारात सांघिक स्पर्धेतही भारतानं रौप्य पदक पटकावलं. दक्षिण कोरियानं सुवर्ण, तर चाननं कांस्य पदक मिळवलं.