पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचं वेस्टइंडिजला ३१५ धावांचं आव्हान

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजपुढे ३१५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं. तिनं ९१ धावा केल्या. प्रतिका रावळ ४०, हार्लिंग देओल ४४, हरमनप्रीत कौर ३४, तर रिचा घोषनं १३ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं.  वेस्ट इंडिजतर्फे जैदा जैम्सनं ५ बळी टिपले.