भारतीय महिला हॉकी खेळाडू वंदना कटारिया हिनं आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमधून अधिकृतरीत्या निवृत्ती जाहीर केली आहे.
वंदनाने आपल्या हॉकी कारकिर्दीची सुरुवात २००९ मध्ये केली होती. तेव्हापासून तिने ३२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून १५८ गोल नोंदवले तसंच टोकियो ऑलिम्पिक मध्ये हॅट्ट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला हॉकी खेळाडू ठरली होती. तिला २०२१ मध्ये अर्जुन पुरस्कार तसंच धनराज पिल्ले पुरस्कार आणि २०२२ मध्ये पद्मश्री ने गौरवण्यात आलं होतं.
Site Admin | April 1, 2025 2:12 PM | Vandana Kataria | निवृत्त | महिला हॉकीपटू
भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारिया आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमधून निवृत्त
