October 23, 2024 2:43 PM

printer

१७ वर्षांखालील फुटबॉल आशियाई चषक पात्रता फेरीत भारताची आज ब्रुनेई दारुस्सलामविरुद्ध लढत

१७ वर्षांखालील फुटबॉल आशियाई चषक पात्रता फेरीत भारतीय संघ आज ब्रुनेई दारुस्सलामविरुद्ध खेळणार आहे. थायलंडच्या चोनबुरी स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. भारतीय १७ वर्षांखालील संघ मुख्य प्रशिक्षक इश्फाक अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

 

पात्रता फेरीसाठी ‘ड’ गटात भारत, थायलंड, ब्रुनेई दारुस्सलाम आणि तुर्कमेनिस्तान यांचा समावेश आहे. यातून गट विजेते आणि पाच सर्वोत्तम द्वितीय स्थानावरील संघ एएफसी १७ वर्षांखालील आशियाई चषक २०२५ मध्ये प्रवेश करतील. सलग चौथ्यांदा या स्पर्धेत स्थान मिळविण्याचं भारताचं लक्ष्य आहे.