दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स ४११ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ३६३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदवलेल्या ३० पैकी १९ कंपन्यांनी वाढ नोंदवली आहे. यात बँका, गुंतवणूक तसंच खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास अडीच हजारांहून अधिक कंपन्यांचे समभाग आज वधारले.
लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या मुंबईच्या शेअर बाजारांमधे मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणेतीन या वेळात होणार आहेत.