November 6, 2024 7:47 PM | Stock Market

printer

भारतीय शेअर बाजार सावरले

देशातल्या शेअर बाजारात आज तेजी दिसली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने गेले दोन दिवस शेअर बाजारात घसरण दिसून येत होती. मात्र, आज अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना त्यात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज ९०१ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ३७८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २७१ अंकांची वाढ होऊन तो  २४ हजार ४८४ अंकांवर बंद झाला.